तांबेवाडी, ता. भुम ग्रामस्थ- दत्तात्रय मच्छींद्र निकम यांचा गावकरी- राहुल दत्तु हांगे, दत्तु हांगे, उषाबाई हांगे यांच्याशी शेतातील पाणी सोडण्याच्या कारणावरुन दि. 30.11.2021 रोजी 10.30 वा. सु. तांबेवाडी येथे हानामाऱ्या झाल्या. यात हांगे कुटूंबीयांनी दत्तात्रय निकम यांना शिवीगाळ करुन, टामीने डोक्यात मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तर दत्तात्रय निकम यांनी राहुल हांगे यांच्या अपंगत्वास हिनवून शिवीगाळ करुन, टामीने डोक्यात वार करुन राहुल यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय निकम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर राहुल हांगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 सह अपंग अधिनियम कलम- 92 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments