बार्शी शहरांमध्ये दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल अशी वाहने लावली म्हणून ; पाच दुकानदारावर शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील वेगवेगळ्या भागातील स्वतःच्या दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल अशी वाहने लावू दिल्याबद्दल व लावल्याबद्दल शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ डिसेंबर रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१) शहरातील कणसे कार ॲक्सेसरीजचे मालक संतोष बब्रुवान कणसे (वय34 वर्षे) रा.ढगेमळा बार्शी ता.बार्शी, २) विजय फायबर अंन्ड मोटर्स या दुकाणाचे मालकाचे मालक विजय कालीदास पवार (वय 23) वर्षे रा.रामेश्वर मंदीर कुर्डूवाडी रोड, ३) बार्शी येथे रोहित टायर पंम्पचर मालक नाव रोहित अशोक सुर्यवंशी (वय.२५) रा.भवानीपेठ कुर्डावाडी रोड, ४) रयल कार असेसरीजच्या दुकाणाच्या मालक फिरोज शेरखान पठाणे (वय.३०) वर्षे रा.जैन मंदीराजवळ कुर्डावाडी रोड, बार्शी ५)
 कणसे कार असेसरीजच्या बाजुला वेलकम वशिंग सेंटरचा बोर्ड रस्त्याच्या कडेला लावुन रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या धोकादायक स्थितीत  स्वतःचे दुकाणाची जाहीरत करत होता. विजय राजेंद्र शिंदे (वय.२१) रा.खांडवी ता.बार्शी  वरील पाच जनावर पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा व जीवितास धोका याअंतर्गत भारतीय दंड संहिता कलम २८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे जी पावले उचलत आहेत, त्याचे संबंध बार्शीकर आपण कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments