मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. हे पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे. बाहेर वेगळं नाव आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वृत्तानुसार माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे.

पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचा कॉल आला होता. दरम्यान पोलिसांकडून या पत्राचा तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments