परंडा/प्रतिनिधी;
परांडा पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली, त्यानुसार वांगी येथील पांडुरंग टकले हा आपाची मोटार सायकलवर जवळाकडुन ढगपिंपरीकडे गांजा घेवुन जाणार आहे, अशी गुप्त माहीती मिळालेवरुन परंडा पोलीस स्टाफसह घारगाव शिवारात जवळा ते परंडा जाणारे रोडलगतचे दक्षिण बाजुचे चाँदसुर्य देवाचे मंदीराजवळ दबा धरुन थांबलो.
पोलिसांना 17.00 वाचे सुमारास एक व्यक्ती संषयास्पदरीत्या आपाची मोटार सायकलवरुन येत असताना दिसल्याने पोलिसांनी त्यास हात दाखवुन थांबविले. सदर इसमाचे जवळील साहित्याची पाहणी केली असता त्याचे जवळ गांजा सदृष्य माल दिसुन आल्याने त्यास सदर मालाबाबत विचारता त्याने गांजा असल्याचे सांगीतले. त्यावेळी मी सदरची हकीकत पोलीस ठाणे अमंलदार पोहेकाँ/596 मोरे यांना मोबाईल वरुन कळवुन पोलीस निरिक्षक श्री गिड्डे साहेब यांना सदर इसमाचे झडतीकामी तहसिल कार्यालय परंडा येथील तहसिलदार, दोन शासकीय पंच, वजन काटा करणारे व्यक्ती, फोटोग्राफर, पोस्टेचे लाखसिल व सिल करण्याचे साहीत्य घेवुन या असे सांगुन त्याबाबत ठाणे अंमलदार यांनी नोंद नं 31/2021 वेळ 17.13 वा नोंद करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक गिडडे साहेब यांनी संबंधितांशी पत्रव्यवहार करून पोलीस निरीक्षक सो, पोलीस अंमलदार, नायब तहसिलदार वाबळे साहेब पंच नामे 1) पमुलाल आनंदा डावरे वय 51 वर्षे, व्यवसाय नोकरी अव्वल कारकुन तहसिल कार्यालय परंडा रा. दस्तापुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद 2) आण्णासाहेब पंढरीनाथ बनसोडे वय 56 वर्श, नोकरी अव्वल कारकुन तहसिल कार्यालय परंडा रा. परडा ता. परंडा जि. उस्मानाबाद बाबा बहीरे याचे संजीरी ट्रेडर्स आडत दुकान येथील वजन काटा करणारे मजुर हारुण बाबु शेख व फोटोग्राफर नामदेव कुंडलीक वाघमारे असे इलेक्ट्रीक वजन माप, पोलीस ठाणे सिल, लाख, मेणबत्ती, दोरा, माचीस इतर आवष्यक साहित्यासह घटनास्थळी हजर आले. तेथे हजर असलेल्या सदर इसमास आम्हा पोलीसांनी, पंचांनी, पोलीस निरिक्षक श्री गिड्डे साहेब, नायब तहसिलदार श्री. वाबळे साहेब यांनी ओळख सांगितली. त्यानंतर त्यास आम्ही तालुका दंडाधिकारी अथवा न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष झडती घ्यावयाची आहे काय असे विचारले असता त्याने झडती घेण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
त्यावेळी आम्हा पंचासमक्ष सदर इसमास नाव, गाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पांडुरंग बाबुराव टकले रा. वांगी खुर्द ता. भुम असे असल्याचे सांगीतले. सदर इमसाची झडती घेता त्याचे कब्जात खालील वर्णनाचा मोबाईल, मोटारसायकल व अंमली पदार्थ माल मिळुन आला तो1) 5,000/- एक काळे रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल त्याचा आयएमईआय नंबर 864799042847006 व 864799042847014 असा असलेला त्यात आयडीया कंपनीचे सीमकार्ड नं 7350988209 व एअरटेल कंपनीचे सीमकार्ड नं 8208507987 असा असलेला जुवाकिंअं.2) 35000/- एक काळे रंगाची टि.व्ही.एस. आपाची कंपनीची मोटार सायकल पुढील बाजुस नंबर प्लेट नसलेली, पाठीमागील बाजुस नंबर प्लेटवर वदसल शेतकरी असे लिहीलेले तिचा चेसी नं. MD634KE43G2L43823 जुनी वापरती, गाडीचे उजवे बाजुस एक पांढरे रंगाचे नाँयलाँनची गोणी. 3) 60,900/- मोटार सायकलचे उजवे बाजुची पांढरे रंगाचे नाँयलाँनची गोणी सोडुन पाहीली असता आतमध्ये दोन पकेट खाकी रंगाचे चिकट टेपने चिकटविलेले. त्याचे वजन करुन पाहता एक पकेट 2.040 किलो ग्रँम व दुसरे पकेट 2.020 ग्रम वजनाचे असे एकुण 4.060किलो ग्रम वजनाचे उग्र वास येत असलेला बिया फुले पाने असलेला हिरवट रंगाचा प्रति किलो 15000/- रुपये प्रमाणे एकुण कि. अं.--------- 1,00,900/- --------- असे वरीलप्रमाणे जप्त करण्यात आलेला गांजा सदृष्य मालातुन सी. ए. तपासणीकामी प्रत्येक पकेट मधुन 50 ग्रमचे प्रत्येकी तीन सम्पल असे दोन्ही पकेज मधुन एकुण सहा सम्पल एकुण 300 ग्रम गांजा संदृष वस्तु वजन मापक हारुण बाबु शेख यांचेमार्फत सी. ए. तपासणी, तपासीक अधिकारी व आरोपीकरीता काढुन घेवुन त्यास पोस्टेचे लाख सिल करुन त्यावर आमची, नमुद दोन्ही पंच व नायब तहसिलदार श्री. वाबळे साहेब यांचे सहयाचे लेबल लावण्यात आले आहे. तसेच उर्वरित 3.760 किलो ग्रम गांजा सदृष्य वस्तु ही मिळुन आलेल्या नायलाँन च्या गोणीमध्ये पक करुन त्यावर आमचे, नमुद दोन पंच व नायब तहसिलदार श्री वाबळे साहेब यांचे सहीचे लेबल लावुन जागेवरच लाखेने सील करून त्याचा सविस्तर असा पंचनामा जप्त केले आहे. त्यावेळी आम्हा पंचासमक्ष सदर इसमास सदरचा गांजा कोठुन आणला हे विचारता त्याने सदरचा गांजा हा युवराज परदेषी रा. तेर जिल्हा जालना मोबाईल नंबर 9730293332 यांचेकडुन आणला असल्याचे सांगीतले.
तरी वर नमुद तारीख, वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे पांडुरंग बाबुराव टकले वय 23 वर्षे, रा. वांगी खुर्द ता. भुम याने युवराज परदेशी रा. तेर जिल्हा जालना यांचेकडुन वरील नमुद वर्णनाचा गांजा आणुन तो आपले कब्जात गांजा वाहनासह बाळगलेला मिळुन आला आहे. म्हणुन माझी त्यांचेविरूध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 (ब) अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments