बार्शी/प्रतिनिधी:
लग्न झाल्यावर सुरुवातीचे तीन महिने चांगले नोंदवले पण लग्नानंतर तीन महिन्याने चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण, मानसिक छळ, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पांगरी पोलिसात सासू-सासरे यासह तिला जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निवेदीता विक्रांत सोनवणे (वय 26) रा B73/14बिबवेवाडीपुणे हल्ली रा. गोरमाळे ता. बार्शी यांना लग्न झाल्यानंतर सुरूवातीचे तीन महिने मला चांगले नांदविले, त्यानंतर चारित्र्यावर संशय घेवुन जाचहाट करून माहेरून पैसे आन व वाटनीची शेती वाटुन घे असे म्हणत फिर्यादीला उपाशी पोटी ठेवुन मानसिक व शारिरीक छळ केला आहे. तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाऴी दमदाटी केली. त्यामुळे पती विक्रांत लहु सोनवणे ,सासु दैवशाला लहु सोनवणे, सासरे लहु बाबु सोनवणे सर्व रा. B73/14 बिबवेवाडी, पुणे या तिघांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी फिर्यादीला समुपदेशन केंद्र बार्शी किंवा सोलापूरला तक्रार दाखल करा असे सुचवले, तरी फिर्यादीने मला कुठल्या हि समुपदेशन केंद्रात जायचे नसून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध तक्रार द्यायची आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
0 Comments