टाईम्स साप्ताहिकाने २०२१ या वर्षामधील शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून या यादीत पहिल्या १०० व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश आहे. टाईम्सने म्हंटले आहे कु, गांधी व नेहरूंनंतर भारतीय राजकारणावर नरेंद्र मोदी यांच्याएवढा प्रभाव कोणी पाडला नव्हता.
टाईम्सच्या यादीतील इतर शंभर जणांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.
0 Comments