बार्शी! सिल्व्हर ज्यूबिली हायस्कूलच्या कर्मचाऱ्याला मिळवून दिला; बहुजन शिक्षक संघाचे उपोषण मागे


  सिल्व्हर जुबिली हायस्कूल बार्शी या शाळेतील सेवाज्येष्ठ शिपाई- सुनिल सगरे  यांना लिपिकपदी
पदोन्नती मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने
शाळेसमोर १७ डिसेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण
सुरु केले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी चर्चा केल्यानंतर रात्री उशीरा पदोन्नती देत असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण यशस्वी रीत्या मागे घेण्यात आले अशी माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली.

"पदोन्नती दिल्याशिवाय माघार नाही"- भालशंकर
आमरण उपोषण सुरू होताच मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे
यांनी संघटनेचे अध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर यांच्याशी
भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पदोन्नती देऊ असे तोंडी सांगितले, त्यानंतर उपमुख्याध्यापक अनिरुध्द चाटी
अधीक्षक राहुल साखरे हे उपोषण स्थळी येऊन उपोषण मागे घेण्याची  विनंती करीत होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेबभालशंकर यांनी पदोन्नती मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे ठणकावून सांगितले. 
 पदोन्नती देण्यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी ,अधीक्षक राहुल साखरे , महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश
गायकवाड,राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, तालुकाध्यक्ष

धनाजी धिमधीमे,शहराध्यक्ष मालिकार्जुन कोवळे,
सेक्रेटरी सिदाम हिप्परगी यांनी सविस्तर चर्चा केली.
शेवटी संस्था तसेच  मुख्याध्यापकांशी राहुल साखरे यांनी चर्चा केल्यानंतर रात्री उशीरा लेखी पत्र संघटनेला मिळाले. त्यानतंर संघटनेने उपोषण मागे घेतले.आमरण उपोषन  यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष धनाजी धिमधिमे सेक्रेटरी सिद्राम हिप्परगी, शहराध्यक्ष मल्लीकार्जुन कांबळे, बाबुराव हिप्परगी, शाहु वाघमारे,मिलींद ताकपेरे, गणेश तांबे, भीमराव काकडे, उत्तर सोलापूर
तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, विजयकुमार लोंढे, चंद्रमणी वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, नेताजी घोरपडे,सुशिला कांबळे, संगीता सगरे, सागर बादगुडे, वैजी नाथ लोखंडे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.या उपोषणाला टी.डी एफ शिक्षक संघटनेचे नेते सचिन

झाडबुके,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दिपक खंदारे यांनी
समक्ष उपसस्थित राहून पाठींबा दिला होता.संघटनेची मागणी मान्य करून सभासदास न्याय मिळवून दिल्याबद्दल संघटनेने संस्था, शाळा, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक, अधीक्षक या सर्वाचे आभार मानले.
   अण्णासाहेब भालशंकर.

Post a Comment

0 Comments