महसुल विभाग व वाळु माफियांच्या 'मधूर' संबधामुळे बार्शीत अवैध वाळू चोरट्यांना मोकळी वाट ..


तहसीलदार यांचे दुर्लक्षामुळे बार्शी शहर तालुक्यात अवैध वाळु वाहतुक बोकाळली

बार्शी शहर व तालुक्यात वाळु माफीयांचा रात्रीस खेळ चाले असा प्रकार सुरु असुन यामुळे लाखों रुपयाचा शासनाचा महसुल तहसीलदार व महसुल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे बुडत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे अशी नागरीकातुन मागणी होत आहे.

बार्शी शहरात भोगावती (पानगाव), देवगाव सीना नदीसह आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळुची वाहतुक होत आहे. तर काही वाळु चोरट्यांना ओढे ही कमी पडु लागल्याने ओढ्याची वाळु देखील राजरोस चोरटी वाहतूक  होत आहे मात्र अद्याप तहसीलदार व महसुलचे सर्कल अधिकारी तलाठी कडुन वाळूच्या अर्थकारणामुळे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित आहे यामुळे हा वाळुचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. रिकाम्या पडीक प्लॉट ,शेतात तसेच नदीकाठी मोठ्या प्रमाणात वाळुचे साठे केले आहेत तर बार्शी शहरात व परिसरात शेकडो बांधकामे सुरु असुन त्याला लागणारी वाळु चोर वाळु हायवा,पीकअप, बंदिस्त टॅम्पोतुन बांधकाम ठिकाणी रात्रीत पोहचवतात. मात्र शासनाचा लाखों रुपयाचा महसुल बुडत असताना अद्यापपर्यंत तहसीलदार महसुल विभागाकडुन बार्शीतील वाळु चोरीवर कारवाईचा बडगा उगारला नसल्याने त्यांचे कारभाराविषयी संशय व्यक्त होत आहे माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे तसेच प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ‘मधुर संबंधामुळे’ सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची खंत परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

रात्रीस खेळ चाले: सध्या शहरात वाळुची चोरटी वाहतुक सुरु असल्याने तसेच वरिष्ठांपर्यत मंथली जात असल्याने परिणामी वाळूचे भाव वाढले आहेत. याच संधीचा फायदा घेत वाळू माफिया प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून वाळू साठा करत मागणीनुसार वाळू विक्रीचा गोरखधंदा करत आहेत. त्यासाठी या माफियांनी रात्रीची वेळ निवडली आहे. रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतो.
 बार्शी महसुल विभाग जरी या प्रकरणांपासून ‘अनभिज्ञ’ असला तरी स्थानिक रहिवासी मात्र नक्कीच या प्रकरणापासून अनभिज्ञ नाहीत.

Post a Comment

0 Comments