बार्शी! गणेश वस्त्र दालनाच्या मालकाविरुद्ध कोरोना नियमाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखलबार्शी शहरातील सुप्रसिद्ध श्री गणेश वस्त्र दालन यांच्या बक्षीस सोडतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. एका ठिकाणी 300-400 माणसे जमवून केली यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गाताचीवाडी शिवारात असलेले राज मंगल कार्यालय येथे गणेश वस्त्र दालन चे मालक यांनी बक्षीस सोडतीचा कार्यक्रम आयोजीत केला, पाहण्यासाठी लोकांची बरीच गर्दी झालेली आहे. बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या आदेशाने राज मंगल कार्यालय, आगळगाव रोड, गाताचीवाडी, ता. बार्शी या ठिकाणी 300 ते 400 लोकांची गर्दी दिसुन आली. लोकांनी मास्क लावले नव्हते व सामाजीक अंतर पाळले नव्हते.  महेश अरविंद यादव, (वय-44) रा. गवसाने प्लट, आगळगाव रोड, बार्शी व सदर राज मंगल कार्यालयाचे मालक यांनी त्यांचे नाव गणेश बबन नान्नजकर, (वय: 42), रा. कन्सर हस्पीटलजवळ, आगळगाव रोड, बार्शी या दोघा वर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकांनी मास्क न लावता, सामाजीक अंतर न पाळता लोकांची गर्दी जमवुन मिळुन आले आहेत. तसेच त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन हयगयीने मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येर्इल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याची कृती केली आहे.  यांचेविरुध्द भा.द.वि. कलम 188, 269, 270, 34 सह आपत्ती व्यवस्थान अधिनियम कलम 51(ब) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments