सोलापूर/प्रतिनिधी:
राज्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा तासांमध्ये संततधार सुरू आहे. उजनी जलाशयामध्ये सुमारे ९० ते ११० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागायती मोठे नुकसान झाले आहे.
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी जलाशय शंभर टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे त्यातच गेल्या आठ दिवसापासून उजनी जलाशयांमध्ये ९० ते ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे उजनी धरणातील जलसाठा मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे जलसंधारण विभागाकडून दक्षता घेतले जात आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
पंढरपूर सांगोला मंगळवेढा माळशिरस तालुक्यात गुरुवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक डोळ्यासमोरून शेतकऱ्यांच्या हातात घेऊन जाताना दिसत आहे यामध्ये द्राक्ष, डाळिंब केळी पपई या बागांना फटका बसू लागला आहे.अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रब्बीतील मका, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आदित आर्थिक संकटात असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आसामी संकटाचा सामना करावा लागत आहे
0 Comments