दोन वर्षांपासून अनुष्का आपल्या गरोदरपणामुळं आणि नंतर मुलीच्या संगोपणामुळं चित्रपटापासून लांब होती. परिणामी तिच्या हातातील चित्रपटामध्ये आता दुसरी अभिनेत्री काम मिळालं आहे. अनुष्का शर्मा भारतीय महिला संघाची महान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करणार होती. पण तिला या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
झुलन गोस्वामीच्या चकदा एक्सप्रेस या बायोपिकमध्ये अनुष्का आघाडीचा रोल करणार होती. पण आता तिच्या जागी तृप्ती डिमरी ही अभिेनेत्री मुख्य भुमिकेत असणार आहे. अनुष्का या चित्रपटामध्ये सहनिर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरू होणार आहे. केवळ नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच आता अनुष्काला डच्चू मिळाल्यानं या जोडीची सध्या सर्वत्र चर्चा होतं आहे.
0 Comments