अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये लग्न गाठ बांधली. दोघांनी अगदी शाही पद्धतीने विवाह केलं. लग्नाबाबतची कोणतीही माहिती त्यांनी अधिकृत रित्या चाहत्यांना दिली नव्हती.
कतरिना विकीपेक्षा अनेक गोष्टीत अव्वल आहे. अगदी इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं झालं तर कतरिनाने विकीला मागे टाकलं आहे. विकीला इंस्टाग्रामवर ११.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कतरिनाला ५९ मिलियन फॉलोअर्स आहेत.
आता सगळ्यांनाच आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलने आपल्या प्रेमात पडणारी कतरिनाने आता विकीचं ही मनं जिंकलं आहे. लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी खास डिश तयार केली आहे.
नुकतेच कतरिना आणि विकी मुंबईत परतले आहे, आणि दोघेही त्यांच्या नव्या घरी राहत असल्याचं बोललं जात आहे. दोघांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. लग्नानंतर कतरिना कैफने आपल्या सोशल मीडियावरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नातील खास फोटो शेअर केला आहे.
0 Comments