कौतुकास्पद! वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला आळा घालून शैक्षणिक साहित्याचे वाटप


सिरसाव/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस वाढदिवसाची क्रेझ वाढत जात असताना वाढदिवसाच्या खर्चाला आळा घालून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परांडा तालुक्यातील सिरसाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये अमोल रामहरी पाटील यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त पहिली ते चौथीच्या एकूण १८५ विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, साहित्य वाटप करण्यात आले. 
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ चोबे बोलताना म्हणाले की, कोरोना काळात झालेल्या झालेली शैक्षणिक हानी ती भरून काढण्यासाठी असे विधायक उपक्रम गावकर्‍यांनी राबवणे गरजेचे आहे. यावेळी ढगे सर, गुंजाळ मॅडम यांनी सहकार्य केले.

 गावातील माजी सरपंच अनिल पाटील,अनंत जाधव, ज्योतिराम पाटील, आबासाहेब मुके, बाळासाहेब वायकुळे मेजर विठ्ठल गावकरे, विशाल झोरी, पांडुरंग चोबे, संतोष चोबे  कार्यक्रमास पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले साधन व्यक्ती डोके सर, साबळे बन सर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सांगता व शाळेच्या वतीने अमोल पाटील यांचा वाढदिवस साजरा करून शाल व श्रीफळ दिले करून कार्यक्रमाची सांगता केली गावातील अमोल पाटील मित्र मंडळ सहभागी होते.

Post a Comment

0 Comments