सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे हे 2 वर्षासाठी तडीपार


सोलापूर:

सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. राजेश काळे हे विद्यमान उपमहापौर व भाजपचे नगरसेवक आहेत. खंडणी सह विविध गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ प्रकरणेही ते बरेच चर्चेत आले होते.

सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून उपमहापौर राजेश काळे यांनी दबावतंत्र आणून शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनेक उद्योग केले आहेत. सर्वसामान्य नागरिकाला धमकावून खंडणी वसूल करणे, ऍट्रॉसिटीचा गैरवापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाणे, सर्व प्रकारचे नियमबाह्य कामे आपल्या पदाचा गैरवापर करून करणे. यामुळे उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर शहर सोलापूर जिल्हा उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तडीपार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments