बार्शी/प्रतिनिधी:
तालुक्यातील बावी येथे शेतामध्ये शेतात शेतात काम करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता घडली असून राजकुमार सिध्देश्वर झाडे वय-३२ वर्षे रा.बावी (आ) ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत सचिन सिद्धेश्वर झाडे यांच्यावर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावी गावातील शिवारामध्ये आपल्या हातातील ट्रॅक्टर हाती घाईने व अविचाराने चालवल्यामुळे पलटी होऊन सचिन झाडे या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. खाजगी वाहनाने बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी व ट्रॅक्टर चे पाच हजार रुपये नुकसान केल्याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये मयतावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट हे करत आहेत.
0 Comments