बार्शी! उसने दिलेले पैसे का मागतो म्हणून एकाला लोखंडी गजाने मारहाण बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

उसने दिलेले पैसे का मागितले म्हणून बार्शी शहरातील नाळे प्लॉट मध्ये एकाला गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी बार्शी शहरात घडली असून
याबाबत गौतम अंबादास पेठाडे (वय 30) रा. नाळे प्लट बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीने गेल्या 5  वर्षा पुर्वी नातेवाईक बायडाबाई धनाजी करपे  रा मंगळवार पेठ बार्शी यांना 80 हजार रुपये उसनवारीने त्यांना गरज असल्याने दिले होते. त्याबाबत तिने 2 वर्षापुर्वी स्टपवर लिहुन दिले होते. फिर्यादी व त्यांची आई साखरबाई असे दोघे मंगळवार पेठ मध्ये राहणेस असलेली बायडाबाई करपे हिचे कडे आम्ही दिलेले पैसे मागण्याकरीता गेलो होतो.

आम्ही त्यांना पैसे मागीतले असता बायडाबाई करपे  व  तिची मुलगी आशा  हिने आम्हाला पैसे देत नाही असे म्हणुन शिवीगाळी करुन तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणाली. त्यावर मी त्यांना 5 वर्षापुर्वी घेतलेले पैसे आहेत थोडे थोडे करुन दया असे म्हणीत असताना आशा ही माझे आईचे अंगावर धावुन आली  त्यावेळी मी त्यांना अंगावर का येताय त्यावेळी आकाश  करपे , व त्याचेवर आणखी एकजन भावकीतील असलेला इसम यांनी हातात दगड घेवुन डोकीत डावे कानाचे वरील बाजुस मारुन जखमी केले त्यावेळी कानाचे पाठीमागील फाटुन जखम झाली  त्यावेळी आकाश याने लोखंडी पाईपने पाठीवर मारले त्यावेळी आजु बाजुचे जमा झालेले लोक जमा होवु लागले त्यावेळी ते निघुन गेले  माझे कानाचे पाठीमागील बाजुस मार लागल्याने रक्ता येवु लागल्याने मी 422 गाडेगाव रोडवरील  ड बांगर यांचे कडे प्राथमिक उपचार घेतलेला आहे.

Post a Comment

0 Comments