बार्शी! सारोळे येथे शेतकऱ्यांना लोखंडी पाईपाने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील सारोळे येथे एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे यामुळे वैराग पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण नानासाहेब गाटे (वय२५)वर्षे रा.सारोळे ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सारोळे गावातील स्टँन्डसमोरील चौकात बसलो होते. आमचे निरगुडीचे झाड निट करुन देणे बाबत विचारणा करुन तु कोठे आहे असे विचारले त्यावर मी त्यास स्टँन्ड चौक सारोळे येथे असल्याचे सांगितले त्यानंतर सांयकाळी 07/30वा.चे. सुमारास आमचे गावातील 1)शदर शिवाजी पाटील 2) प्रथमेश विजयकुमार पाटील 3)विजयकुमार अगतराव पाटील4) शिवाजी आगतराव पाटील सर्व रा.सारोळे असे चौघेजण मी बसलेले ठिकाणी आले.

 तेव्हा शदर व प्रथमेश यांचे हातात लोखंडी पाईप व विजयकुमार व शिवाजी यांचे हातात लोखंडी गज होता त्यानी मला काहीएक न बोलता शदर पाटील यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप माझे उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारला व लगेच प्रथमेश यांनी त्याच्या हातातील लोखंडी पाईप माझे पाठीत मारला तेव्हा माझे जवळच उभा असलेला माझा मेहुणा नागेश्वर हा मला सोडवण्यास आला असता त्यास शिवाजी याने त्यांची गच्ची धरली तेव्हा विजयकुमार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने नागेश्वर यांच्या उजव्या हातात्या खांद्यावर मारला तेव्हा स्टँन्डचौकात असलेले दत्ता भोसले ,देवा गाटे  ज्ञानेश्वर निचळ व कल्पना गाटे यांनी सदरची भांडणे सोडविली तेव्हा ते चौंघेही त्यांच्या घराच्या दिशेने निघुन गेले निघुन जात असताना मी त्याच्या गाड्या पाहील्या असता त्यात युनिकर्न कंपनीची गाडी नंबर एम,एच.13- 7880 व दुसरी फँशन कंपनीची गाडी नंबर एम.एच.25- 9484 असे होते लागलीच भैरु गाटे व विनोद डोके या दोघांनी मसा मोटारसायकलवर मला व माझ्या मेहुण्यास घेवुन वैराग पोलीस ठाणेस येथे आले गाडीवरुन येत असताना मला माझे उजवे हातातील आर्धा तोळ्याचे सोन्याची अंगठी भांडणामध्ये कोठेतरी हरवल्याचे लक्षात आले पोलीस ठाणेस गेलेनंतर तेथील पोलीसांनी आम्हास उपचार यादी देवुन सरकारी दवाखान्यात जाण्यास सांगितले तेव्हा आम्ही आमच्या सोईने सुविधा हस्पीटल बार्शी येथे उपचारास दाखल झालो आहे सध्या आमच्या दोघांवरही उपचार चालु असुन आम्ही दोघेही पुर्णताः शुध्दीवर आहोत झाले मारहीत माझे उजव्या हाताच्या कोपऱ्यास व पाठीस मार लागला असुन नागेश्वर यांचे उजव्या हाताचे खांद्यास मार लागलेला आहे म्हणुन माझी वरील चौघांविरुध्द तक्रार आहे.

Post a Comment

0 Comments