सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापुरात विजापूर रोड परिसरातील सवेरा नगरात रहात असलेल्या पोलीस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ७०हजाराचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ३० हजाराच्या रोकडसह ३ लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी घडली. विकमसिंह देवेंद्र गिड्ढे वय ३५, रा. १०१. सवेरा नगर, सैफुल विजापूर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे विक्रमसिंह गिड्ढे या त्यांच्या भाच्याच्या घरात राहात होते. दरम्यान विक्रमसिंह याच्या मावस भावाच्या लग्नासाठी पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षिरसागर त्यांची पत्नी आणि मुलासह विजापूरला गेले होते जाताना त्यांना त्यांचे घराला कुलूप लावला होता.
याचाच फायदा घेवून चोरट्याने बंद घराचा कड़ो कोयंडा आणि कुलूप तोडून घरात दोन लाखाच्या रोकडसह ३ लाखांचा ऐवज लंपास प्रवेश केला घरातील २ लाख ३० हजाराची रोकड आणि ७० हजाराचे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाखाचा ऐवज कपाटातून चोरून नेले. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.
सोलापूर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चोऱ्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे. चोरट्यांनी नागरीकांची घरे फोडणे, दुकान फोडणे, मंगळसुत्र हिसकावणे, घरातील मोबाईल चोरणे असे प्रकार करून हैदोस माजवला आहे.
त्यातच नुकतेच मागील आठवण्यात एका महिला पोलीसाची मोपेड चोरट्यांनी चोरून नेली त्यानंतर आता थेट पोलीस निरीक्षकाच्या घरातच डल्ला मारून मोठा चोरून नेला. त्यामुळे ऐवज चोरट्यांनी आता पोलीसांना थेट आव्हान आहाम दिले आहे परंतु पोलिसांनी गेल्या महिनाभरात एकही चोरी उघडकीस आणली नाही याचे सर्वसामान्यांम ध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
0 Comments