सलमानच्या ‘अंतिम’ला ‘लावणी’चा तडका…


बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’  या चित्रपटाची रिलीज डेट आता जवळ येत आहे. याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. चित्रपटाचे निर्मातेही त्याच्या प्रमोशनबाबत अतिशय वेगवान हालचाली करत आहे. या बहुचर्चित चित्रपटाबद्दल रोज काही ना काही अपडेट येतच असतात. दरम्यान, या चित्रपटातील ‘चिंगारी’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे.

‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले असून, या चित्रपटातील एक उत्तम गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्यात अभिनेत्री वालुशा डीसूजा नृत्य करताना दिसत आहे. या गाण्यात तिने महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्य सादर केले आहे. नऊवारी लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. नऊवारी साडीत लावणी करून वालुशाने चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे.


‘चिंगारी’ हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरून रिलीज करण्यात आले आहे. गाणे शेअर करताना लिहिले आहे की, ‘ठिणगी आली आहे तुमचा होश उडवण्यासाठी, आग लावण्यासाठी आणि तुम्हाला वेड लावण्यासाठी.’ सुनिधी चौहानने या गाण्याला आवाज दिला असून, हितेश मोडक यांनी संगीत दिले आहे. या लावणी नृत्याची कोरिओग्राफर कृती महेश आहे. संपूर्ण ‘अंतिम’चा म्युझिक फ्लेवर या गाण्यात दिसत आहे आणि हे गाणे या चित्रपटाच्या बीजीएमशीही जुळणारे आहे.

भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवत आहेत
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एक रोमँटिक गाणेही रिलीज झाले होते, जे जुबिन नौटियालने गायले आहे. यामध्ये आयुष शर्मा आणि महिमा मकवाना यांची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील आयुषचा गँगस्टर लूक चांगलाच पसंत केला जात आहे.


‘अंतिम’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली झाली असून, महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये आयुष शर्मा मुख्य भुमिकेमध्ये आहे, तर सलमान खान सेकंड लीडमध्ये आहे. त्याच बरोबर वरुण धवनने देखील यातील एक डान्स नंबर देखील रिलीज केला, ज्याने प्रेक्षकांमध्ये आधीच चर्चा निर्माण केली आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मासोबत जीसू सेनगुप्ता, प्रज्ञा जैसल आणि महिमा मकवाना हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments