बार्शी! दडशिंगे गावाजवळ अपघात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील दडशिंगे पाटीजवळ मोटरसायकलस्वार व नवीन गाडीचा चेसी यांच्यामध्ये जबर अपघात झाला असून मोटारसायकल क्रमांक एमएच 13 एयु 8096 नंबर च्या गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. अभिजीत बिरुदेव पुजारी (वय 32)रा. सावळेश्वर ता. मोहोळ असे जखमी युवकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, असे की सोलापूर बार्शी महामार्गावर दर शिंगे गावाजवळ पुलाचे काम चालू असल्यामुळे रस्त्यावर कोणतेही सूचनाफलक नसल्यामुळे ह्या अपघातास रस्त्याचे काम घेणारी कंपनी जबाबदार आहे. दडशिंगे पाटीजवळ अवताडे कंपनीच्या व PWD चे अधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे मागील ४ महिन्यापासून पुलाचे अर्धवट काम केल्यामुुुुुळे अपघात झााला. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस गणेश चव्हाण व आप्पासाहेब लोहार  व पिंटू नाईकवाडी यांनी जखमीला तातडीने उपचारासाठी पीकमधून हॉस्पिटलला पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments