भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ही जोडी नेहमीच चर्चेत असते. युएईमध्ये पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवेळी सानिया मिर्झा पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्यावेळी आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर या मुद्यावरुन काही भारतीय नेटकऱ्यांनी सानिया मिर्झाला ट्रोलही केले. पाकिस्तानला सपोर्ट करणारी सानिया एकटी भारतीय आहे, असा टोलाही काहींनी सानिया मिर्झाला लगावल्याचे पाहायला मिळाले.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक दोघेही एका पाकिस्तानी चॅनेलवरील शोमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या कार्यक्रातील सूत्रसंचालकाने Behind The Scene मोमेंटमध्ये सानिया मिर्झाला भारत-पाकिस्तान यांच्यातील मॅचवेळी कोणाला सपोर्ट करत असतेस? असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न खूप बोरिंग असल्याचे उत्तर सायनाने यावर दिले. पण किस्सा इथेच संपला नाही. तर तो इथून सुरु झाला.
दरम्यान शोएब मलिकने याठिकाणी एन्ट्री केली. ज्यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यात मॅच सुरु असते त्यावेळी कुणाला सपोर्ट करतेस हे सांगावच लागेल, असे शोएब म्हणाला. यावर सानियाने त्याची फिरकी घेतली. ज्यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील टेनिस सामना सुरु असतो त्यावेळी तू कोणाला सपोर्ट देतोस असा प्रतिप्रश्न तिने पती आणि पाकचा अनुभवी क्रिकेटर शोएब मलिकला केला. यावेळी शोएब मलिकनं खास उत्तर दिले. पत्नीला सपोर्ट करत असताना देशावर प्रेमही करतो, असे तो म्हणाला. त्याच हे उत्तर ऐकून माझंही सेम टू सेम असंच असते, असे सानिया म्हणाली.
0 Comments