धक्कादायक! बलात्कार करून बनवला व्हिडीओ अन् दिली धमकी



 बिहारमधील गया येथे दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. बलात्कार करणारा नराधम पोलीस यंत्रणेचाच व्यक्ती निघाला. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या बहिणीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली. वास्तविक, गया जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आणि कुटुंबाच्या अब्रूसाठी आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर चढत होती तेव्हा स्थानिक लोकांनी तिला वाचवले.
 

पतलुक्का पोलीस स्टेशनचे चौकीदार विजय पासवान यांच्या मुलाने गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता आणि त्याच्या मित्रांनी बलात्काराचा व्हिडिओ बनवला होता. आरोपीने विद्यार्थिनीला धमकी दिली होती, त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असा आरोप आहे की, जेव्हा कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसानेच पीडित मुलीला हे कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली. पोलिसाने त्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप आहे.

पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवण्याऐवजी आरोपीविरोधात केस न करण्याची धमकी देऊ लागल्याचा आरोप बलात्कार पीडितेच्या मावशीने केला आहे. पीडित मुलीच्या मावशीने सांगितले की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती बिहारच्या डीजीपीकडे तक्रार करणार आहे.

 विद्यार्थिनीने सांगितले की, गावातील रहिवासी विकास कुमार याने तिच्यावर बलात्कार केला आणि विकास कुमारचे मित्र बिक्कू सिंह, श्रवण आणि अन्य एकाने व्हिडीओ बनवला. पीडितेने सांगितले की, धमकी देताना विकासने सांगितले होते की, जर घडलेली घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली तर तिच्या बहिणीशीही असेच दुष्कृत्य करेल. इतकंच नाही तर तिच्या भावाची हत्या करेल.

या धमकीने वैतागलेल्या पीडितेने सांगितले की, आपल्या कुटुंबाची अब्रू, बहिणीची इज्जत आणि भावाचा जीव वाचवण्यासाठी तिने टेकडीवर चढून, ब्लेडने नसा कापून आणि नंतर टेकडीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण टेकडीवर जात असताना कोणीतरी पाहिले आणि लोकांनी तिला वाचवले. गया एसएसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, असे प्रकरण समोर आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments