बार्शी! पैलवान मनोज माने यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड ; वस्ताद म्हणून अस्लम काझी यांचे लाभलेले मार्गदर्शन


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील पै. सुनील माने यांचे पुतणे पैलवान मनोज माने यांची बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ९२ किलो वजन गटातून माती विभागातून निवड झाल्याने आगळगाव येथील विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

 पैलवान मनोज माने हे कुर्डूवाडी येथील शिवराय कुस्ती संकुलामध्ये कुस्तीसम्राट अस्लम काजी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत होते. पैलवान मनोज माने यांना वस्ताद म्हणून कुस्ती सम्राट अस्लम काजी, पैलवान फिरोज मुजावर, पैलवान बळीराम जाधव, पैलवान किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले.

पैलवान मनोज माने यांची ९२ किलो वजन गटातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतूक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments