बार्शी/प्रतिनिधी:
येथील जागतिक व संसदीय संघाचे सदस्या डॉ. प्रिया विठ्ठलराव मुपडे यांना मानव विकास संस्था लातूर येथील पर्यावरण व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. यावेळी नामदार संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष इंद्रजीत भालेराव, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री शब्बीर मामू सय्यद, डॉ. विठ्ठल लहाने, मानवविकास संस्थेचे अध्यक्ष वसंत घोगरे पाटिल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॕ. प्रिया यांच्या आई नंदिनी मुपडे, ज्येष्ठ कवी शब्बीर मुलाणी उपस्थित होते.
डॉ. प्रिया मुपडे यांचे पर्यावरण संदर्भात इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याच बरोबर अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना भेटी देऊन वेगवेगळी मदत करण्याचा प्रयत्न करतात.
डॉ. प्रिया यांना यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचा प्रेरणाज्योती पुरस्कार, तुळजापूर येथील समाजभूषण पुरस्कार, पंढरपूर येथील समाजरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असे अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments