अक्कलकोटकडून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा पुढचा टायर फुटल्याने भिषण आपघात; चार जण जागीच ठार


अक्कलकोट/प्रतिनिधी: 

अक्कलकोटकडून सोलापूरकडे येणार्या जीपचा टायर फुटून कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर भिषण अपघात झाला. मंगळवारी (ता. 16) सकाळी झालेल्या या अपघातात तीन ते चारजण जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त व्यक्त केली जात आहे.

सोलापूरकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या जीपचा पुढील टायर फुटला. त्यामुळे सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी जवळ गाडी उलटली. यात प्राथमिक माहितीनुसार तीन ते चारजण दगावल्याची भीती आहे. वळसंग पोलिस तातडीने या ठिकाणी दाखल झाले आहेत.

स्वामी समर्थांचे दर्शन करून सोलापूरकडे येत असताना हा अपघात झाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. एकूण आठ प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी व चारजणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments