पाच लाखाचा गुटखा जप्त, कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


सोलापूर/प्रतिनिधी:

 दि. २३ रोजी अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना प्राप्त गोपनीय माहिती नुसार पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेटच्या टाटा इंट्रा या वाहनातून कर्नाटक या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा घेऊन सदर वाहन पुण्यास जाणार असल्याची माहिती मिळाले वरून, सदर वाहन कामती-मंदृप रोडवर बायपास चौक येथे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पकडले. सदर वाहनाची जागेवर तपासणी करण्याचा उद्देश वाहन चालक यांना सांगून वाहन तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले असता वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेऊन वाहन तिथेच सोडून शासकीय कामात अडथळा आणून पळ काढला.

त्यात विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधित तंबाखू एकत्रित अंदाजे किंमत रुपये ४,८७,२००/- हा माल जागेवर पंचा समक्ष जप्ती पंचनामा करून सील करून ताब्यात घेण्यात आला. अनोळखी आरोपीवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३, ३२८ व ३५३ नुसार कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न). प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त  शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments