पोलिसांचे धक्कादायक कृत्य! गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार


पोलीसच भक्षक झाल्याची खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन युवकावर पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी समोर आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला असून या अत्याचाराची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत रविवारी पुन्हा अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित पोलिसाने पीडित युवकाकडून चार हजाराची खंडणीसुद्धा उकळली आहे. हणमंत कृष्णा देवकर (३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर याच्यावर कॉलेजच्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं आधी पीडित तरुणाकडे त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागितला व तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला विरोध दर्शवत मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणांकडे पैशाची मागणीही केली. तसेच मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवायला देत नसशील तर मी तुझ्यासोबत शरीरसंबंध करणार असे म्हणत, व्हिडिओ शूट करत युवकावर अनैसर्गिक संभोग केला. इस्लामपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे पोलिसांचे नाव बदनाम होत आहे.

Post a Comment

0 Comments