सोलापूर : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २२ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १ डिसेंबरपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील माळशिरस, श्रीपुर, वैराग, नातेपुते व माढा या नगरपंचायतीसाठी निवडणुक होणार आहे. 21 डिसेंबरला येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 23) अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली होती. या नगरपंचायतीची सदस्यसंख्या १७ असून या नियोजित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार केल्या आहेत.
सोमवारी (ता. 29) येथील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यात श्रीपुर, वैराग व नातेपुते या नगरपंचायती नव्याने स्थापन झालेल्या आहेत. माढा व माळशिरस या नगरपंचायतीची मुदत संपल्याने तेथे प्रशासक आहेत. या नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी चार, ओबीसींसाठी चार व महिलांसाठी नऊ जागा अशा 17 सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाली.
महिलांच्या नऊ राखीव जागामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन व ओबीसीसाठी दोन आणि सर्वसाधारण विभागात पाच जागांचा समावेश आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज वितरण व सादर १ ते 17 डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, अर्जांची छाननी बुधवारी ८ डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 13 डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत व हरकती घेण्याचा दिनांक 13 डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत, चिन्ह वाटप 13 डिसेंबरला दुपारी ३ नंतर, मतदान 21 डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत व मतमोजणी 22 डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून होणार आहे.
0 Comments