वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील भातंबरे गावांमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या एक जनावर वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. बळवंत रामचंद्र वाघमोडे वय ४२ रा. भातंबरे ता-बार्शी असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस पेट्रोलिंग करत असताना भातंबरे गावांमध्ये विनापरवाना दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भातंबरे येथील बलुते गल्लीत बळवंत वाघमोडे यांचे घराचे आडोशाला एक इसम चोरुन दारू विक्री करीत आहे. एक इसम आपले समोर पिशवी घेवुन बसलेला दिसला. त्यांच्याकडे टँगो, ब्रिझ, ऑफिसर चईस ब्यु, मँकडल नंबर ०१ रम, अशी ४७८० रुपयांची दारु जप्त केली. असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती पोलिस निरीक्षक विनय बहिर प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
0 Comments