बार्शी/प्रतिनिधी:
उसने घेतलेले पैसे परत दे म्हणून बार्शी तालुक्यातील येमाई तांडा येथे दोघा जणांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली असून ईश्वर लक्ष्मण राठोड,(वय- 27) रा. यमाईतांडा तांबेवाडी ता-बार्शी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी तालुक्यातील यमाईतांडा तांबेवाडी आंगणवाडी शाळेसमोर चौकात येथे बाबाजी शिवाजी पवार याचे फिर्यादी घेतलेले दहा हजार रुपये परत न दिल्याचे कारणारवरुन १) बाबाजी शिवाजी पवार २) विकास शिवाजी पवार ३) शेवंता शिवाजी पवार,४) पापी बाबाजी पवार, ५) शिवाजी पोमा पवार ,६) पोपट शोभा राठोड,७) आक्षय पोपट राठोड, ८) संगिता पोपट राठोड सर्व रा. यमाईतांडा तांबेवाडी ता.बार्शी जि.सोलापुर यांनी संगणमत करुन फिर्यादी व त्यांचा भाऊ श्रीकृष्ण लक्ष्मण राठोड याला लाकडी काठीने, दगडाने व छोटा चाकुने मारहाण करुन जखमी केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी व धमकी दिली. त्यामुळे भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 Comments