बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे बोर चालू करण्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाला कुऱ्हाडीचा दांड्याने मारल्याची घटना घडली आहे. सुरेश विठोबा शिंदे ,(वय ५०)रा -गोरमाळे फिर्यादीवरून मोठा भाऊ अर्जुन विठोबा शिंदे त्याच्यावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ११.३० वाजता कांद्याला पाणी देण्यासाठी सामायिक बोअर चालू करण्यासाठी गेलो. बोअर चालु करण्याचे कारणांवरून फिर्यादीचा थोरला भाऊ अर्जुन विठोबा शिंदे रा गोरमाळे ता बार्शी जि सोलापुर याने शिवीगाळी करून माझे अंगावर धावुन येवुन त्याचे हातातील कु-हाडीचे दांड्याने माझे पाठीत मारून जखमी करून परत जर तु बोअरला हात लावलास तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली आहे. अशी माहिती पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी दिले.
0 Comments