‘त्या’ एसटी कामगारांची नोकरी जाणार?; परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा


एसटी महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारकडून ही मागणी मान्य झाली नसल्याने संप सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतंरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला असल्याने आता महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईनंतर एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांना कायमचं कामावरून काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी न्यायलयाचा आदेश आल्यानंंतर एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून संप मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. नाहीतर कडक कारवाई करावी लागेल असा ईशाराही दिला होता. दरम्यान, विलनीकरणाचा निर्णय तात्काळ घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकाडून सांगण्यात आलं आहे. तर जोपर्यंत एसटी महामंडळाच सरकारमध्ये विलनीकरण होत नाही.

Post a Comment

0 Comments