बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आहे. कंगना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबतचे व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कंगनाने नुकताच सोशल मीडियावर एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तीची एंट्री झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या फोटोमध्ये एक कपल एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अगदी रोमाँटिक अंदाज उभे असल्याचे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, तेरे लिए हम है जिए, कितने सितम हम पे सनम. कंगनाच्या या फोटोवरून आत्ता ती पुन्हा प्रेमात पडली की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.कंगनाच्या आयुष्यात ‘या’ व्यक्तीची एन्ट्रीतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये कंगनाने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिले की, मी एक सर्वसामान्य मुलगी आहे. माझ्याबद्दल काही खास सांगण्यासारखे नाही पण मी प्रेमाच्या सुंदर भावनेवर विश्वास करते. यामुळेच मला एका सुंदर जगाला भेटता आले. कंगनाचा हा फोटो चाहत्यांना फारचं आवडला आहे.
दरम्यान कंगनाने शीख समाजाबद्दल केलेल्या एका विधानामुळे अडचणीत सापडली आहे. याप्रकरणी दिल्ली विधानसभेने कंगनाला समन्स बजावला असून ६ डिसेंबर रोजी एका समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांचा खलिस्तानी दहशतवादी असा उल्लेख केला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले, तसेच देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
0 Comments