बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील हिंगणी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीला माहेरी पाठवले त्याचा आमच्यावर संशय का घेता म्हणून शेजाऱ्यांनी दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. नवनाथ बापुराव नागरगोजे वय- 32 रा - हिंगणी ता बार्शी यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ
लक्ष्मण व त्याची पत्नी या दोघांमध्ये मागील सहा महिण्यापुर्वी वादविवाद झाल्याने ती मागील सहा महिण्यापासुन उपळाई ता कळंब येथे तिचे माहेरी राहणेस होती. आमचे शेता शेजारीच आमचे गावातील श्रीमंत भैरू गव्हाणे यांची शेतजमीन आहे. त्यांचा मुलगा नामे हणुमंत याची पत्नी व माझा भाऊ लक्ष्मण या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातुन हणुमंत याने त्याचे पत्नीस वीस दिसापुर्वी माहेरी पाठवुन दिले आहे सदर घटनेची सगळ्या गावात चर्चा झाल्याने मागील पंधरा दिवसापुर्वी हणुमंत श्रीमंत गव्हाणे, दादा श्रीमंत गव्हाणे व महादेव श्रीमंत गव्हाणे हे तिघेही आमचे घरी तलवारी घेवुन येवुन आमची बदनामी झाली आहे तुझ्या सगळ्या घरादाराला जीवच मारतो अशी धमकी देवुन गेले होते.
आमचे द्राक्षेची बाग फवारत असताना माझी शेताशेजारील महादेव गव्हाणे हा माझे जवळ येवुन तुमचा पिक्चर वाजवत असतो अशी धमकी देवुन निघुन गेला होता .सायंकाळी 04/00 वा.चे सुमारास माझी आई काशीबाई बापुराव नागरगोजे वय 50 वर्षे ही आमचे घरामागे जनावरे राखण्याकरीता गेली होती सायंकाळी 05/30 वा चे सुमारास मी राहते घरासमोर उभा असताना मला माझ्या आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी आमचे घराचे पाठीमागे आईकडे गेलो असता तेथे आमचे गावातील 1) हणुमंत गव्हाणे 2) दादा गव्हाणे 3) महादेव गव्हाणे 4) श्रीमंत गव्हाणे व 5) दादा गव्हाणे याची पत्नी हे सर्वजन माझे आईस लाथाबुक्याने मारहाण करत होते मी जवळ जावुन पाहिले व त्यांचे तावडीतुन आईला सोडवले.
तेव्हा हणुमंत गव्हाणे, दादा गव्हाणे व महादेव गव्हाणे हे तिघेही ते घेवुन आलेल्या भगव्या रंगाच्या कुबोटा ट्रक्टरकडे जावुन ते तिघेही ट्रक्टरमधुन कु-हाडी व काठ्या घेवुन आले तेव्हा महादेव याने आज यांना जिवंत सोडायचे नाही असे म्हणताच दादा गव्हाणे याने त्याचे हातातील कु-हाडीने माझे आईस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कु-हाड मारली तेव्हा मी त्यास सोडविण्यास गेलो असता मला ही हणुमंत गव्हाणे याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील कु-हाड माझे डोक्यात मारली . लागलीच महादेव याने त्याचे हातातील काठीने माझ्या पायावर मारहाण केली तसेच श्रीमंत याने लाथाबुक्याने मारहाण केली व दादा याचे पत्नीने माझे आईचे केस ओढुन तिस ढकलुन देवुन लाथाबुक्याने मारहाण केली. तेव्हा आमच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन शेजारील शेतकरी बापुराव नागरगोजे ,दिपक नागरगोजे व माझी पत्नी विजयमाला असे सर्वजण तेथे आले व त्यांनी सदरची भांडणे सोडविली.तेव्हा वरील सर्वजन ते घेवुन आलेल्या कुबोटा ट्रक्टरमधुन निघुन गेले. आमच्या दोघांच्याही डोक्यातुन खुप रक्त येत असल्याचे पाहुन लागलीच दिपक याने आमचे घरी जावुन माझी बोलेरो जिप घेवुन आला. व आम्हा दोघांनाही जिपमध्ये घेवुन बाबासाहेब नागरगोजे याचेसह जगदाळे मामा हस्पिटल, बार्शी येथे आणुन दाखल केले आहे. सध्या आम्हा दोघांवरही उपचार चालु असुन आम्ही दोघेही पुर्णतः शुद्धीवर आहोत. झाल्या मारहाणीत मला कपाळावर गंभीर जखम झाली असुन माझे पायास,पाठीस मुक्कामार लागलेला आहे तसेच आई काशीबाई हिचे डोक्यात उजव्या कानाच्या वर गंभीर जखम झाली असुन तिचे सर्व अंगास मुक्कामार लागलेला आहे म्हणुन माझी मला व माझे आईस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केलेबाबत वरील लोकांविरुद्ध तक्रार आहे.
0 Comments