बार्शी तालुक्यातील पांगरी पंचक्रोशीतील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पांगरी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरी परिसरातील बारावी कला शाखेत शिकणारी सतरा वर्षे चार महिन्याची अल्पवयीन मुलगी शेतामध्ये स्वच्छालयात जाते म्हणून घरातून निघून गेली. बराच वेळ घरी न आल्याने नातेवाईकांना फोनव्दारे संपर्क साधुन मुलगीची विचारपुस करून शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. यामुळे पांगरी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पांगरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी दिली.
0 Comments