वैराग/प्रतिनिधी:
माहेरहून तीन लाख रुपये आण म्हणून बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी प्रतिभा बबन गुंड (वय ३२) यांच्या फिर्यादीनुसार बबन रंगनाथ गुंड यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन रंगनाथ गुंड हे पत्नीला माहेरवरुन तीन लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन शारिरीक मानसिक त्रास देत असत त्याचबरोबर चारित्र्यावर संशय घेवुन पतीला व मुलाला शिवीगाळी मारहाण करत व उपाशी पोटी घराबाहेर ठेवले तसेच पैसे न आणल्यास अंगावर पेट्रोल टाकुन जिवे मारील अशी धमकी देत. दिवाळी आल्यावर पैसे आणले नाहीत पत्नीला मारहाण केली आहे. माहेरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे तीन लाख रुपये देऊ शकले नाहीत. भारतीय दंड संहिता ३२३, 498-A, ५०४, ५०६ प्रमाणे वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
0 Comments