औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक यांनी दहा हजार रुपयांची मागणी केल्यामुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक हरिचंद्र अशोक नरके,( वय ४०) यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे उघडकीस झाल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद च्या वतीने कारवाई करण्यात आली.
पो.स्टे ला जमा केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली. या तक्रारींचे अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले .ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पांडत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी केली आहे.
0 Comments