सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी बसवेश्वर स्वामी यांना सोमवारी १५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. समाज कल्याणच्या सभापती संगीता धांडोरे यांच्या ऍन्टी चेंबरमध्ये कक्ष अधिकारी बसवराज स्वामी याने तक्रारदाराला बोलावले. त्याठिकाणी कोणी येणार नाही, सभापतीही त्याठिकाणी नसल्याने स्वामी याने लाच घेण्यासाठी ते सुरक्षित ठिकाण निवडले. त्याला त्याच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी या गावासाठी दलित वस्ती सुधार निधी द्यावा, अशी मागणी सरपंचाने ग्रामसभेतील ठरावाआधारे केली होती. त्यासाठी त्यांनी झेडपीतील समाज कल्याण विभागाचे उंबरठे झिजवूनही निधी मिळत नव्हता.
निधी मंजुरीसाठी कक्ष अधिकारी बसवराज स्वामी याने तक्रारदाराकडे 30 हजारांची लाच मागितली. 2 नोव्हेंबरला ही रक्कम निश्चित करण्यात आली. गुरुवारनंतर (ता. 4) दिवाळी सुट्टी लागणार असल्याने ती रक्कम दिवाळी सुट्टीहून आल्यावर सोमवारी (ता. 8) देण्याचे ठरले होते. त्यानुसार स्वामी याने तक्रारदाराला थेट समाज कल्याण कार्यालयात बोलावून घेतले.
झेडपी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज स्वामीला आला नाही. सभापतींच्या ऍन्टी चेंबरमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना स्वामी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नेण्यात आले. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. स्वामी याला आता मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. ही कारवाई लाचलुचपतचे उपअधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी यांच्या पथकाने केली
0 Comments