त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचं चित्र आहे. गाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे.
यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मला खूप कीव येते आणि वाईट वाटतं की राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहेत. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी थोबाडीत लगावलं असतं.
काय चाललंय काय हे? राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, ९५ टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, ५ टक्के जो गडबड करतो, त्याचा निषेध करा ना! मुस्लिमांच्या मतांसाठी हे सगळं करताय? असा सवाल त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, पाच टक्के मुसलमान त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक होतात, त्यावर सुद्धा तुम्ही टीका करत नाही? त्रिपुराचं कारण सांगून इथे अमरावती, मालेगावमध्ये अस्थिरता निर्माण करणं योग्य आहे का? काल अनेक ऑफिसेस आणि दुकाने फोडण्यात आली, त्यावर टीका करा, मुस्लिम मतांची काळजी करु नका, असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
0 Comments