बार्शी/प्रतिनिधी :
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे.
पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा होईल.
आशिष मिश्र या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पुढे लोकशाही मार्गाने तीन काळे कृषी कायदे मागे घ्या व शेतकरी हिताचे इतर मागण्या घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मिश्र यांच्या मुलाने फॉर्च्युनर गाडी घालून त्या शेतकऱ्यांना क्रूरपणे मारून टाकले. त्यामुळे या शहीद शेतकऱ्यांचा लढा विचार व शेतकरी संघर्ष सर्व सामान्य जनते पर्यंत नेऊन पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अस्थिकलश संपूर्ण देशभर फिरत आहे, त्याचाच एक भाग म्हणून तो बार्शी मध्ये येईल असे भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लक्ष्मण घाडगे यांनी सांगितले आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये होणाऱ्या या अभिवादन सभेसाठी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, नागरिकांनी तसेच पुरोगामी पक्ष, संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे भारतीय किसान सभेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments