मोदीजी कोणत्या चौकात आणि काय शिक्षा द्यायची सांगा


 दहशतवाद संपला नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक म्हणाले की, आज नोटबंदी ला पाच वर्ष पूर्ण झाली. मोदी म्हणाले भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल पण तो संपला का ? असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला.

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली तेव्हा भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल, काळा पैसा परत आणू अशी अनेक आश्वासने दिली. तसंच भ्रष्टाचार संपला नाही तर मला चौकात शिक्षा द्या असं म्हटलं होतं. मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे झालं नाही तेव्हा त्यांना आता कोणती शिक्षा द्यायची असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.

नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली, नोटबंदीच्या एका निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. नोटबंदीला पाच वर्षे होत आहेत, तुम्ही म्हणाला होतात चौकात शिक्षा द्या , चौक कोणता आणि देशाच्या जनतेनं तुम्हाला काय़ शिक्षा द्यावी ते सांगा असं मलिक यांनी म्हटलं.

दहशतवाद संपुष्टात येईल असा दावा केला गेला पण असं झालं नाही. उलट नोटबंदीमुळे रांगेत उभा राहून लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असा आरोपही नवाब मलिक यांनी केली. ते म्हणाले की, मोदींनी सांगितलं होतं की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. आता पाच वर्षे झाले. भ्रष्टाचार हद्दपार झाला का, दहशतवाद संपला का? काय झालं यातलं? मोदीजी तुम्हीच सांगा चौक कोणता आणि आता काय शिक्षा द्यायची?

Post a Comment

0 Comments