२८ वर्षाच्या ऊसतोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू


सोलापूर/प्रतिनिधी:

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे एका २८ वर्षाच्या ऊसतोड कामगाराचा कॉनॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुसूर- विंचूर रस्त्यावर रविवारी (ता. ३१) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोपट दादाराव कांबळे (वय २८, जुनामोड, भीमनगर, बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कुसूर येथे रेवप्पा अप्पासाहेब बुदाळे या शेतकऱ्याचा ऊस तोडण्यासाठी हा कामगार आला होता. भांडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याला ऊस तोडण्यासाठ हा कामगार आला होता. घटनेची माहिती समजताच मंद्रूप पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागचे कारण अद्याप समजलेले नाही. कांबळे यांचा मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी मंद्रूप येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.

कुसूर- विंचूर रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये ऊसतोड कामगार पडल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. याचा तपास मंद्रूप पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments