अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार प्रकरणात बार्शी सेशन कोर्टाने सुनावली दहा वर्ष कारावासाची शिक्षा




अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी सेशन कोर्टाने आरोपीस सुनावली दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा बार्शी सेशन कोर्ट , दिनांक २ ९ / १० / २०२१ – वर नमुद आरोपी सागर दिपक जगताप वय २२ वर्षे याने दि . २१/१०/२०१८ रोजी सायं ८/०० वा अल्पवयीन पिडीता ही खेळत असताना आरोपीने तिचे तोंड दाबून एका घराच्या पाठीमागे नेहून तिचे तोंड दाबून जबरी संभोग केला . व याबाबत घरी कोणास सांगीतले तर जिवे मारण्याची धमकी दिली . त्यानंतर पिडीतीचे पोटात खुप दुखू लागल्याने ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी पिडीतेवर अत्याचार झाल्याचे पोलीस ठाणेस फोन करून सांगीतले नंतर पोलीसांनी पिडीतेचे आईचा जबाब नोंदवून आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणेस भा.द.वि. कलम ३७६ ( ए ) ( बी ) , ५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ५ ( आय ) , ६ अन्वये दि . २४/१०/२०१८ रोजी गुन्हा दाखल केला . पोलीसांनी आरोपीस अटक करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले . सबळ पुरावा गोळा करून सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी ९ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वकिलांनी बचावासाठी २ साक्षीदार तपासण्यात आले . यातील फिर्यादी व पिडीतीची तसेच फिर्यादीचे साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी सपोनि श्री राजेंद्र मगदूम यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे व पिडीते बरोबर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंघाने मे . कोर्टासमोर आलेला पुरावा या सर्व बाबी मे . कोर्टासमोर सहा सरकारी वकिल यांनी मे . कोर्टासमोर मांडल्या व आरोपीने बचावासाठी आणलेले दोन बचावाचे साक्षीदार आरोपीच्या बचा साठी साहयभुत नाहीत . संपूर्णबाब रेकॉर्डवर आणली . सरकार पक्षाचे वतीने युक्तीवाद करण्यात आला की , आरोपीने आल्पवयीन मुलीवर अमानुष असे कृत्य केलेले आहे , तसेच फिर्यादी व इतर साक्षीदार यांची आरोपी सोबत कोणत्याही प्रकारे पूर्व वैमनस्य नसल्याने खोटया गुन्हयात आरोपीस गुंतवले नाही . सदर बाब सरकार पक्षाचे युक्तीवादामध्ये निदर्शनास आणुन देण्यात आली व सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहायक म्हणुन मा.ना. सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले . सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता मा . अति . सहा . जिल्हा न्यायाधीश श्री . एस.डी अग्रवाल साहेब यांनी आरोपी यास भादविक ३७६ ( २ ) अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्त मजुरी व ५,००० / – रू दंड व दंड न भरल्यास १ वर्षाची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली . भादविक ५०६ अन्वये २ वर्ष सक्त मजुरी तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४ अन्वये सात वर्षे सक्त मजुरी व ५००० / – रु दंड व दंड न भरल्यास एक वर्षाची सक्त मजूरी तसेच आरोपीने पिडीतेस नुकसान भरपाई पोटी रक्कम रु १०,००० / – देणेबाबत मा . न्यायालयाने आदेश केले . सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश सुनावण्यात आले . सरकार पक्षा तर्फे अॅड . प्रदिप बोचरे , तत्कालीन सरकारी वकिल दिनेश देशमुख व शाम झालटे यांनी काम पाहीले . सदर केसमध्ये मा . श्री विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी व मा श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले . सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री राजेंद्र मगदूम यांनी केलेला होता . तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोना अमृत खेडकर यांनी काम पाहिले .

Post a Comment

0 Comments