बार्शी/प्रतिनिधी:
विवाहित महिलेचा अनेक वेळा पैशासाठी छळ केल्याची उदाहरणे आहेत परंतु उच्चशिक्षित असाल असणाऱ्या डॉक्टर पतीने पत्नीचा छळ करून बेल्टने मारहाणही केले आहे ५० लाख रुपये देवूनही पैशासाठी डॉक्टरपत्नीचा छळ करणार्या डॉक्टरपती विरोधात बार्शीत गुन्हा दाखल झाला आहे.
विविध कारणाने वारंवार होणार्या पैशाच्या मागण्या पुर्ण करुन सुमारे ५० लाख रुपये दिले तरी डॉक्टर पत्नीचा छळ करणारा डॉ. आनंद जालींदर पांढरे व सासू शारदा जालींदर पांढरे (रा. ए/338 कर्निक नगर, सोलापूर हल्ली रा. सरस्वती बिल्डींग नं.9 फ्लॅट नं.304 सेक्टर 19 श्री रामकृष्ण कर्णमहाराज रोड नेरूळ ईस्ट नवी मुंबई ) यांच्याविरोधात सौ. चैताली आनंद पांढरे (रा. सरस्वती बिल्डींग नं.9 फ्लॅट नं.304 सेक्टर 19 श्री रामकृष्ण कर्णमहाराज रोड, नेरूळ ईस्ट, नवी मुंबई हल्ली सृजन बंगला, नाईकवाडी प्लॉट, उपळाई रस्ता, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. मोरे यांनी जावयाला ऍडमिशन घेवून देवून शिक्षणाचा सर्व खर्च केला. डॉ. पांढरे एकटेच मुंबईला गेले.
0 Comments