वडिलांचे होते अनैतिक संबंध, मुलींनी भररस्त्यात दोघांना धू धू धुतले


वडील आईला सोडून पर स्त्रीसोबत फिरतात, तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवतात या रागातून दोन तरुणींनी त्यांच्या वडिलांना व त्यांच्या प्रेयसीला भररस्त्यात धू धू धुतले. राजस्थानमधील भिलवारा जिल्ह्यातील हनुमान नगर य़ेथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर व्य़क्ती त्याची पत्नी व दोन मुलींसोबत भिलवारा जिल्ह्यात राहतो. त्याचे एक महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याच्या घरी याबाबत माहित असून त्यावरून घरात अनेकदा वाद व्हायचे. त्याची पत्नी व मुलींनी अनेकदा त्याला त्या महिलेपासून लांब राहायची ताकिद दिली होती. मात्र तो त्यांचे काहीच ऐकत नव्हता.

शुक्रवारी सदर व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होती. त्या ठिकाणीच त्याच्या मुली देखील होत्या. मुलींना पाहताच ते दोघे कारमध्ये बसून तेथून निघू लागले. मात्र मुलींनी त्याची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी वडिलांना गाडीतून बाहेर काढले व मारहाण करायला सुरुवात केली. त्या मुलींनी वडिलांच्या गर्लफ्रेंडला देखील बेदम मारहाण केली. दरम्यान रस्त्यावरील लोकांनी मध्यस्थी करून त्या मुलींना अडवले. .याप्रकरणी अद्याप कोणाकडूनही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.

Post a Comment

0 Comments