शहरातील ह्या अनाधिकृत रिक्षा वाहनतळावर रिक्षा लावल्यास कारवाई करणार: पोलीस निरीक्षक रामदास शेळके


बार्शी/प्रतिनिधी:

अनाधिकृत रिक्षा वाहनतळावर रिक्षा लावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवहान बार्शीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी रिक्षाचालकांना केले आहे.

 १.जुनी चाटे गल्ली येथील बालरोगतज्ञ मोरे हॉस्पिटल समोर, २. मंगळवार पेठ टेकडीजवळ लक्ष्मी तिर्थ  रस्त्यालगत, ३. मंगळवार पेठ उत्तरेश्वर नाक्या समोर, ४. एकविराई चौक, ५. भोसले चौक येथे  रिक्षा स्टँड साठी , जिल्हाधिकारी तसेच बार्शी पोलीस स्टेशन कडून  कुठलाही अभिप्राय प्राप्त केलेला नसल्यामुळे वरील रिक्षा स्टँड अनधिकृत असून तेथे कोणताही रिक्षा स्टॅन्ड बोर्ड लावल्यास किंवा वाहन थांब्यावर थांबून वाहतुकीस अडथळा  निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल ,असे आवाहन रिक्षा वाहन चालकांना बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments