बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान टीम सोबत पेट्रोलिंग करत असताना महाद्वार रोड ते सावरकर चौक यामध्ये असणाऱ्या मोरे हॉस्पिटलच्या आवारामध्ये बेकायदा व बेशिस्त पार्किंग केल्याचे आढळून आल्याने डॉक्टरला बोलून घेऊन पेशंटच्या गाड्याची व्यवस्था करावी अथवा वॉचमन ठेवावा जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही अशी व्यवस्था करावी. वाहतुकीला अडथळा होईल अशी पार्किंग व्यवस्था केल्यास कायदेशीर कारवाई करू अशी पोलीस निरीक्षक म्हणाले.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने रस्त्यावर पार्किंग करू नयेत, वाहतुकीस अडथळा होईल अशी वाहने बाजारपेठेमधील रस्त्यावर लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
0 Comments