करमाळा! निमगाव(ह) मध्ये जबरदस्तीने ओढा शेतीत ढकलून केला जातोय अन्याय; निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांकडे केली पोलिस संरक्षणाची मागणी



करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील मारुती नीळ वैगरे ८  लोकांनी आमच्या शेतात ओढा पात्र जबरदस्तीने ढकलून शेतीचे अतोनात नुकसान केले आहे ते तात्काळ काढून घेण्यासाठी आदेश द्यावेत अन्यथा आम्ही आमच्या मुला बाळासह उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन हनुमंत जगताप व नारायण जगताप यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना दिले आहे. 
      
श्री जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, आमच्या मालकीच्या शेतात मारुती नीळ वैगरे ८ लोकांनी मुळ ओढा पात्र जबरदस्तीने  ढकलून अतिक्रमण केले आहे ते तात्काळ काढून घेणेस आदेश देऊन आमच्या मागासवर्गीय कुठुंबास पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. व पुढे म्हंटले आहे की, करमाळा तालुक्यातील निमगाव (हवेली)येथील आमच्या मालकीची वडिलोपार्जित शेत जमीन गट नंबर ८० हि जमीन आहे. या शेत जमीनच्या पूर्वेस व दक्षिणेस गाव नकाशात दाखवल्याप्रमाणे ओढा पात्र हे गट नंबर ७९अ व ७९ ब या मधील असणाऱ्या जुन्या दोन विहिरींच्या मधून मुळ ओढा पात्र आहे. परंतु त्याठिकाणी मुळ ओढा पात्र न ठेवता गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वेकडील व दक्षिणेकडील जमीन गट नंबर ७९अ व ७९ ब या शेत जमीनीचे मालक असलेले
दत्तात्रय दिगंबर नीळ,मारुती विनायक नीळ, दादासाहेब देवराव नीळ,माणिक विनायक नीळ, लक्ष्मण दिगंबर नीळ, संजय दिगंबर नीळ,अशोक पोपट नीळ,ज्ञानेश्वर पोपट नीळ
 या लोकांनी आम्ही लहान वयात असताना आमचे वडील व चुलते यांना दमदाटी करून,आमच्या  मालकीच्या शेतात मनगट  जोरावर मुळ ओढ्याचे पात्र जबरदस्तीने ढकलून अतिक्रमण केले आहे. व आजही आहे.आम्ही (मागासवर्गीय) मातंग समाजातील असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत कोणीही न्याय मिळवून दिला नाही. आम्हा मागासवर्गीय कुठुंबावर मारुती नीळ वैगरे ८ लोकांनी जाणीवपूर्वक घोर अन्याय केलेला आहे.व आमची जमीन बळकावली आहे.
      

तसेच आम्ही आमच्या हद्दीतील ओढा पात्र काढून मिळणे बाबत तहसीलदार करमाळा यांचेकडे रितसर तक्रार केली होती, त्यावरून तहसीलदार करमाळा यांचे आदेशा वरून मंडल अधिकारी यांनी सविस्तर चौकशी करून मारुती विनायक नीळ वैगरे ८  लोकांनी ओढा पात्र ढकलून अतिक्रमण केले आहे असा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार तहसीलदार करमाळा यांनी आम्हास तुमची जमीन मोजणी करून घ्यावी असे सांगितले होते. त्यावरून आम्ही आमची जमीन गट नंबर ८० ची मोजणी करून घेतली आहे. 

त्याप्रमाणे आमच्या मालकीच्या शेत जमीनीमध्ये 
मारुती विनायक नीळ, दत्तात्रय दिगंबर नीळ, दादासाहेब देवराव नीळ, लक्ष्मण दिगंबर नीळ,अशोक पोपट नीळ,ज्ञानेश्वर पोपट नीळ, माणिक विनायक नीळ वैगरे लोकांनी आमच्या शेत जमीनीचे नुकसान करून गेल्या अनेक वर्षांपासून आमची जमीन बळकावली आहे व या मध्ये अतिक्रमण केले आहे असे सिद्ध झाले आहे. त्यावरून आम्ही वरील सर्व लोकांना समक्ष भेटून आम्हाला आमची जमीन काढून द्या, मुळ गाव नकाशात दाखवल्या प्रमाणे ओढा पात्र ठेवा अशी विनंती केली. परंतु सदरील लोक मुद्दाम आमची जमीन काढून देत नाहीत.तसेच सदरील ओढा पात्र काढून घेण्यासाठी, शेतीची कामे करण्यासाठी आम्हाला जेसीबी, ट्रॅक्टर हे यंत्र सामग्री मिळू देत नाहीत. व आम्ही मागासवर्गीय कुठुंबातील असल्यामुळेच वरील सर्व लोक आमच्यावर मनगट जोरावर सतत अन्याय करीत आहेत.
 
  कृपया आपण स्वतः लक्ष घालून आम्हा मागासवर्गीय  समाजातील कुठुंबास न्याय मिळवून द्यावा व आमच्या हद्दीत केलेले अतिक्रमण मारुती विनायक नीळ वैगरे लोकांनी त्यांच्या खर्चाने काढून घेणेस सर्व संबंधितांना आदेश द्यावेत अशीहि विनंती केली आहे. निवेदनात शेवटी म्हटले आहे की, मारुती विनायक नीळ वैगरे ८ लोक हे अत्यंत क्रूर व खुनशी वृत्तीचे आहेत. याशिवाय यापूर्वीही मारुती नीळ वैगरे लोक यांचे विरूद्ध करमाळा पोलीस स्टेशन मध्ये विविध प्रकारचे व गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी अशोक व ज्ञानेश्वर याचे वडील याचा शेतीच्याच कारणावरून वाद होऊन खूण झाला होता म्हणून पोपट नीळ हा जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेला एक इसम आहे. त्यामुळे आमचे सर्वच कुठुंब मारुती नीळ वैगरे लोक यांच्या दहशतीखाली आहे. 

त्यांच्या पासून आमच्या जीवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे. हे लोक गावात नेहमीच मनगट जोरावर दहशत निर्माण करत असतात. याच लोकांनी जमीन गट नं.७९,८०,८१ कडे जाणारा सरकारी रस्ता आहे या रस्त्यावर मनगट जोरावर अतिक्रमण करून रस्ता  बंद केला आहे. तोही सरकारी रस्ता खुला व्हावा म्हणून आदेश द्यावेत हि विनंती.
               
तरी आपण वरील सर्व वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहता आम्हास पोलीस संरक्षण मिळावे व वरील सर्व लोकांच्या विरूद्ध योग्य ती कारवाई होणे विषयी व आमचे शेतात केलेले अतिक्रमण काढून व मुळ ओढा पात्र गाव नकाशात दाखवल्याप्रमाणे जमीन गट नंबर ७९ अ व ७९ ब मधील असलेल्या जुन्या दोन विहिरींच्या मधून मारुती नीळ वैगरे ८ लोक यांच्या खर्चाने काढून देण्या विषयी आपण आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत हि नम्र विनंती. अन्यथा आम्ही व आमचे घरातील सर्व लोक महीला,मुलाबाळासह दिनांक  २७ /१०/२०२१ रोजी पासुन तहसील कार्यालय करमाळा समोर उपोषणास बसणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी असे नमूद केले आहे. या निवेदना सोबत भूमी अभिलेख कार्यालय करमाळा यांचे कडील हद्दी खुणा कायम केलेला नकाशा.व अतिक्रमण केले बाबत ची हद्दी खुणा आहेत त्याची नक्कल प्रत. तहसीलदार साहेब करमाळा यांचे कडील पत्र.,मारुती नीळ वैगरे लोक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या FIR झेरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय (मामा) भरणे , गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,मानवी हक्क आयोग, म. राज्य,अध्यक्ष साहेब,मागास वर्गीय आयोग, राजू शेट्टी,अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश (दादा)कांबळे, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस प्रमुख (ग्रामीण) सोलापूर, उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा,तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना ईमेलद्वारे व समक्ष भेटून दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments