माळशिरसमध्ये न्यायाधीशाच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड गेले चोरीला



माळशिरस/प्रतिनिधी:

माळशिरस दिवाणी न्यायाधीश  जी.एम. नदाफ यांच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले  आहे. ही चोरी बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत माळशिरस तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली आहे. 

चोरट्यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शिताफिने या चंदनाच्या झाडाचा मुख्य बुंधा करवतीने कापून नेला. न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. वन विभागाकडे नोंद केलेल्या या चंदनाच्या झाडाची किंमत ही जवळपास सात हजार रूपयांच्या आसपास होती. या घटनेचा अधिक तपास माळशिरस पाेलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments