अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे आता विवाह बंधनात अडकले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवह पार पडला. विवाह प्रसंगी जवळचे नातेवाईक आणि मित्र हजर होते.
प्रसिद्ध फोटोग्राफर पराग सावंत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री आयुषी भावे एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती उत्तम डान्सरही आहे. ती लवकरच चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
तर सुयश टिळक याने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. तो टीव्ही मालिकांमुळेही लोकप्रिय आहे.
0 Comments